लेखन: लखीचंद जैन
***
नेटकरी मराठी मित्रांनों,
मीही आलोय तुमच्या जोडीला कट्टयावर. तुमच्याशी
गप्पा मारायला… एका नाजूक-हळव्या विषयावर चर्चा करायला नि ‘ती आणि मी’ या नव्या blogच्या माध्यमातून थोडं वेगळं शेअर करायला. विषय नवा नाही आणि वेगळाही
नाही; पण ‘तो’ इंट्रेस्टिंग आहे.
…
'ती' आठवली
की
आपण पूर्णपणे ब्लँक होऊन जातो नि आपल्या डोळ्यांसमोर फक्त
'ती'च उभी राहते. प्रत्येकाच्या आयुष्यात 'ती' कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हमखास जुळलेली असते. काही क्षणासाठी… काही काळासाठी ! प्रत्येकाची आपली ‘ती’ खास असते आणि 'ती'ची बात ही काही औरच असते. प्रत्येकाच्या
जीवनातील
'ती'चे स्वरूप नि अस्तित्व हे वेगवेगळे आहे. प्रत्येकाच्या अनुभवानुसार 'ती' बद्दलच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात… काही चांगल्या, तर काही वाईटही... ती म्हणजे फक्त 'ती'च नाही.
…
ती म्हणजे कल्पना…
ती म्हणजे कविता नि कादंबरी…
ती म्हणजे आकृती-कलाकृती…
ती म्हणजे थप्पड… ठोकर…
ती म्हणजे
भरारी…
ती म्हणजे आठवण…
ती म्हणजे
उचकी…
ती म्हणजे
प्रेरणा…
ती म्हणजे लेखणी…
ती म्हणजे स्वप्न …
ती म्हणजे वादळ-वावटळ…
ती म्हणजे पणती… तेवणारी ज्योती…
ती म्हणजे
आई…
ती म्हणजे बहीण…
ती म्हणजे सहचारिणी…
ती म्हणजे मैत्री…
ती म्हणजे प्रियसी…
ती म्हणजे
गीत, धून…
ती म्हणजे सवय…
'ती' म्हणजे बरेच काही…
अगणिक रुपे आहेत 'ती'ची !
आयुष्यात ‘ती’ भेटली, तर ‘ती’ बरेच काही देऊन जाते… बरेच काही घेऊन जाते. 'ती' कधी झपाटून टाकते, तर कधी ओरबाडून जाते. 'ती'नं झपाटून टाकलं, की आपल्याला अक्षरश: वेड लागायचं तेवढं बाकी राहतं. 'ती'च्या साठी आपण वेड्यासारखे धडपडत असतो,
पडत असतो…
नि उठून पुन्हा नव्या दमाने धावत असतो… या वेड्यागत जगण्यातून नवे काही शिकत आपण स्वत:ला घडवत जातो… ध्येयाचा पाठलाग
करीत स्वप्नं साकारत जातो.
…
मैत्रीच्या
रूपातील ‘ती’ आठवली, की
आपण अलगदपणे भूतकाळात डोकावतो… आपलं हळवं मन हळूच भूतकाळाची ‘ती’ पानं पलटवत बसतं. कधी-कधी नुसती ‘ती’ शब्दही डोळ्यापुढं तरळयला, की ऊर भरून येतं… श्वास घेणं
ही अवघड होऊन बसतं आणि
आसवांच्या सरी बरसायला लागतात.
…
गल्लीत राहणारी... बस स्टॉपवर भेटणारी… चाळीतल्या वरच्या मजल्यावरची… शाळेतली… कॉलेज
कट्टयावर मनमोकळेपणे
बोलणारी…
कधीच न बोललेली; पण स्मित हसणारी… डोळ्यांना
डोळ्याची भाषा शिकवणारी ‘ती’ कधीतरी आपली खास असते. ‘ती’चं भावविश्व विस्तारलं…नि ‘ती’ची सोबत लाभली तर जीवनाचा पट खुलत जातो… नात्यांची वीण घट्ट होत जाऊन
नव्या नात्यांचा सुंदर गोफ तयार होतो.
…
कधी-कधी ‘ती’ आपली होत नाही; मग ‘ती’च्या सोबतीचे, मैत्री, विरह, आठवणींचे व
हकीगतच्या प्रवासातले काही हळवे-सुखद जे क्षण आपण जगलेलो असतो; ते क्षण जीवनाच्या कुठल्याश्या वळणार पुन्हा ‘ती’ दिसली की जागे होतात.
…
आता तर फेसबुकवर फ्रेंड्स म्हणून ‘ती’ला रिक्वेस्ट पाठविता
येते, नि ‘ती’ची रिक्वेस्ट एक्सेप्ट करता येते. मैत्री नको असेल; तर ‘तो’ही ‘ती’ला आणि 'ती'ही त्याला ब्लॉक करू शकते. अशी ‘ती’ मग क्षणात डोक्यातही जाते. काहींच्या आयुष्यात तर
‘ती’ कुठल्याश्या वळणार भेटते नि पुढे ‘ती’ कायमची मनात ठसून राहते. प्रत्येकाच्या आयुष्यात ‘ती’ असते आणि ‘ती’च्या साठी ‘मी’ असतो…
…
जसजशी 'ती' आपल्याशी जुळत जाते, तसतशी आपल्यातील 'मी' पणाची वृत्ती समर्पित होत जाते. दोघे नकळत एक-मेकांत सामावले जातात... नवे सृजन घडवित
जातात. कधी-कधी 'ती' सावली सारखी सोबतीला असते.
…
या blog च्या माध्यमातून आपण बघणार
आहोत, ‘भवरू-कांताबाई’ यांच्या मूक प्रवासाचा एक अनोखा पट! बहिणाबाईंच्या खानदेशातल्या, वयाची सत्तरी ओलांडलेल्या पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना पत्नी कांताबाईंच्या समवेत पंचेचाळीस वर्षांच्या जीवन प्रवासात पंचेचाळीस तासही संवाद साधता आला नाही; पण दोघांचा ध्यास मात्र एकच होता...
शेतक-यांच्या शेतात सदैव हिरवाई नांदावी.
प्रत्येकाच्या घरातली चूल रोज नीट पेटावी. डॉ. भवरलाल जैन यांनी ठिबक सिंचनानं
इथली माळरानं हिरवाईनं
फुलविली...त्यांनी उभारलेल्या उद्योगातून कितीतरी
हातांना रोजगार मिळाला.
आजही जवळपास पाच हजार घरातल्या चूली नीट
पेटत आहेत,
या घरांमध्ये सुख-शांती नांदत आहे. डॉ. भवरलाल जैन यांनी पत्नीच्या
मृत्युपश्चात ‘ती आणि मी’य चा सुरेख व वाचनीय असा शब्दबंध वीणलाय पुस्तकरूपात.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात… एकत्रित कुटुंबपद्धतीची वाताहत होत चालली असतांनाच्या पार्श्वभूमीवर ‘ती आणि मी’ हे पुस्तक बरेच काही सांगून जाते.
…
या blog वर वेगवेगळ्या क्षेत्रातील काही सृजनशील मनं ही लिहिणार आहे, त्यांच्या जीवनातल्या ‘ती आणि मी’ विषयी. तुमच्याही ‘ती’ आणि ‘त्या’ विषयीच्या हळव्या व नात्यांची गुफंण घट्ट करणा-या काही आठवणी-साठवणी
असतील तर त्या feedback.tnme@gmail.com या इमेल पत्त्त्यावर शेअर करा… त्या ‘ती’ला
आणि 'ती' मध्ये सामावलेल्या 'मी' ला जपण्यासाठी !
***
'ती आणि मी' या साहित्यकृतीतील नायिका कांताबाईंच्या समवेत
स्वत: लेखक भवरलाल जैन यांनी अनुभवलेले काही दुर्मिळ क्षण !
‘ती आणि
मी’ पुस्तक लिहिण्यामागची कल्पना-
‘ती आणि मी’ मध्ये कोणतीही गोष्ट ओढून-ताणून आणलेली नाही. दुसरे असे, की कोणत्याही प्रकारचा अलंकार या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केलेला नाही. जे काही
लिहिले आहे ते
वास्तव आहे. वास्तव हे जर
नागडे असेल, तरीसुद्धा ते चांगले दिसते, या विचारातून हे पुस्तक मी लिहिले आहे. ज्या वेळी आंतरिकरीत्या दोन जीव एकत्र येतात, त्या वेळी भाषेला नि शब्दांना विराम मिळतो, फक्त शांततेतूनच हे घडते आणि ती शांतता आम्ही आयुष्यभर अनुभवली.
‘स्त्री’ला काही भावना असतात, त्यांचा आदर आपण करायला हवा, अगदी मनापासून. ती स्त्रीसुद्धा तोलामोलाची तशी असली पाहिजे; मग तुम्हाला तो आविष्कार वेगळा वाटणार नाही. तुमच्याच व्यक्तित्वाचा तो आविष्कार आहे, असे वाटले पाहिजे. दोघांना बोलायचा असा कधी प्रसंग आलाच नाही म्हणून मी या
पुस्तकात लिहिले आहे, की पंचेचाळीस वर्षे बरोबर राहून पंचेचाळीस ताससुद्धा लौकिकदृष्ट्या ज्याला संवाद म्हणतात, तो ही नाही साधला गेला. आमच्या जीवनात विषयच काय होते बोलायला? तिने तिच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले होते व मी माझ्या जीवनाचे ध्येय निश्चित केले होते. दोन्ही ध्येयांची गोळाबेरीज करूनच जीवन जगावे, यातच आनंद आहे, हेही निश्चित झालेले होते आणि तो आनंद आम्ही उपभोगत होतो. पदोपदी आम्हाला त्याचा अनुभव येत होता.
जर तुम्हाला असे डोळे असतील; मग ते अंतर्मनाचे असो किंवा बाह्य शरीराचे असो; तर तुम्हाला बोलण्याची गरज तेवढी भासू नये, मला तरी भासली नाही. तिने स्वीकारलेल्या धोरणाप्रमाणे ते कधीच सांगितले नाही. तिने स्वीकारलेल्या धोरणाप्रमाणे वितुष्ट होणारे किंवा विसंगत होणारे काम कधीच सांगितले नाही. ‘तू’ आणि ‘मी’ हा अहम् यामुळे मावळलेला असतो. त्यामुळे विषय पांगत नाही, पसरत नाही. म्हणून तशा आठवणी काही जमेलाच नाहीत. काय करू? जर त्या असत्या तर त्याही एवढया प्रामाणिकपणे मांडल्या असत्या.
- डॉ. भवरलाल जैन
***
No comments:
Post a Comment